पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपसोबत चर्चा सुरु केल्याने आमदार नाराज'

शोभा ओझा

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसला मात्र याचा काही परिणाम होणार नाही, असाच विश्वास दिसतोय. राज्यात सुरु असलेल्या राजकीय तर्क वितर्काच्या दरम्यान काँग्रेसने आमदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मध्य प्रदेश काँग्रेसच्या मीडिया विभागाच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २२ आमदारांच्या राजीनाम्याने सरकारवर काहीच परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

MP : २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर बहुमताचा कल भाजपकडे

शोभा ओझा म्हणाल्या की, काँग्रेसने बोलवलेल्या बैठकीला काँग्रेसच्या आमदारांसह अपक्ष आमदारही उपस्थितीत होते. आमच्याकडे बहुमताचा आकडा असून आम्ही मिळून लढणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेच्या मागणीचे कारण सांगत आमदारांना आपल्या बाजूने वळवले होते. त्यांनी (ज्योतिरादित्य शिंदे) भाजपसोबत चर्चा सुरु केल्यानंतर आमदारांच्यामध्ये संतापाची भावना आहे. सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करु, असेही त्यांनी सांगितले.   

MP: बसपा-सपा आमदारही भाजपच्या गळाला?, तरीही काँग्रेसला सरकारवर भरवसा

मध्य प्रदेशमध्ये काल रात्रीपासून वेगाने सुरु झालेल्या राजकीय नाट्यानंतर आज ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही बोलले गेले मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर २२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्हे अधिक स्पष्ट होऊ लागली. भाजपकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. सरकार पाडण्यात आम्हाला कोणताही रस नाही, असे शिवराज सिंह यांनी म्हटले होते. त्यांच्या भोपाळस्थित निवासस्थानी राजकीय नेत्यांच्या सुरु असलेल्या भेटी गाठीतून वेगळेच चित्र निर्माण होते. काँग्रेसचा विश्वास सार्थ ठरणार की भाजप त्यांना सत्तेतून खाली खेचण्यात यशस्वी होणार हे येणारा काळच ठरवेल. संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी किमान आणखी पाच-सहा दिवस प्रतिक्षाच करावी लागणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:MP Congress Crisis Shobha Ojha says despite the resignations of MLAs there is no threat to the Kamal Nath government