पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तरुणाची स्कूटी १५ हजारांची अन् चलान फाडले २३ हजार

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून नव्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या एका दिल्लीकराला नव्या नियमानुसार, दंडात्मक कारवाई अंतर्गत आपल्या गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक दंड भरण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील गीता कॉलनीमधील रहिवासी असलेल्या दिनेश मदान नावाच्या तरुणाला नव्या नियमाचा चांगलाच फटका बसला. वाहतूक पोलिसांनी त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करताना तब्बल २३ हजार रुपयांचे चलान फाडले. 

पुण्यातील CCTV मुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या किती जणांना दंड झाला माहितीये?

१ सप्टेंबरपासून देशभरात वाहतूकीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमानुसार दंडात्मक कारवाईची रक्कम पूर्वीपेक्षा कितेक पटीने वसूल करण्यात येत आहे. गुरुग्राम पोलिसांनी सोमवारी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात दिनेश मदान याच्यावर हेल्मेट न घालणे, परवाना आणि गाडीची कागदपत्रे नसल्यामुळे ही कारवाई केली. 

Dinesh Madan: Value of my scooty is around 15,000.I even got a copy of RC on WhatsApp from home but by then he had printed.The amount could have been less if he had waited for a while. I want that fine should be relaxed. From now on I will always carry my documents. https://t.co/dJo5BeIcGD

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हेल्मेट नसल्यामुळे दिनेशला रोखण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना, गाडीची कागदपत्रे नसल्याचे समोर आले. त्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात आल्याच माहिती पोलीसांनी दिली आहे. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये दिनेश म्हणाला की, माझ्या स्कूटीची किंमत १५ हजार रुपये आहे. मी आरसी बूकची कॉपी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मागवली होती. पोलिसांनी चलान करण्यात थोडी दिरंगाई दाखवली असती तर चलान कमी झाले असते. दंडामध्ये सूट द्यावी, अशी इच्छा व्यक्त करत इथून पुढे गाडीची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवेन, असेही तो यावेळी म्हणाला.