पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

९० वर्षीय मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष होण्याची शक्यता

मोतीलाल व्होरा

लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या राजीनाम्यावरुन निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीवर पूर्णविराम देत राहुल गांधी यांनी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा केली आहे. त्याचबरोबर पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती गठीत करण्याची सूचनाही केली. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ९० वर्षीय मोतीलाल व्होरा यांच्याकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जात नाही. तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे हंगामी अध्यक्षपदी राहतील. 

आता राहुल गांधी फक्त खासदार! ट्विटर प्रोफाइलमध्ये केला बदल

दरम्यान, काँग्रेसच्या घटनेनुसार अध्यक्षाच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या सर्वांत ज्येष्ठ सरचिटणीसला हंगामी अध्यक्षाचा पदभार देण्याची तरतूद आहे. त्यानुसार मोतीलाल व्होरा हे सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मोतीलाल व्होरा यांनी त्यांना आतापर्यंत याबाबत काही सूचना मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

मी राजीनामा दिलाय, लवकर अध्यक्ष निवडा : राहुल गांधी


(स्त्रोतः हिंदुस्थान टाइम्स)