आईने पोटच्या गोळ्याला विष घालून मारल्यानंतर मुलाच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभियंता असलेल्या तरुण हा नशेच्या आहारी गेला होता. याच रागातून महिलेने आपल्या मुलाला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तामिळनाडूमधील थेनी येथी हा प्रकार घडला.
'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'
मृत तरुणाचे वय २५ ते ३० च्या दरम्यान इतके आहे. त्याचा शिरच्छेद कापलेला मृतदेह पोलिसांना आढळला होता. हात आणि पायाचे देखील तुकडे तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी यासंदर्भातील गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत. मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला आणि एक पुरुष भरलेले पोते फेकून देत असल्याचे आढळून आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस संबंधित महिलेपर्यंत पोहचले. चौकशी दरम्यान महिलनेने स्वत:च्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.
राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री
मृत तरुणावर चोरीप्रकरणातही काही गुन्हे नोंद असल्याचे समोर येत आहे. नशेत धुंद असताना तो घरामध्ये राडा करायचा. रविवारी नशेतच तो घरी आला. आईने जेवणातून त्याला विष दिले. जेवण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने मुलाचे तुकडे तुकडे केले. मुलाचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने ज्या पुरुषाची मदत घेतली त्याचा पोलिस शोध घेत आहेत.