पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विवाहबाह्य संबंधांतून पाच मुलांच्या आईने केली नवऱ्याची हत्या

खून (प्रातिनिधिक छायाचित्र)

दिल्लीमध्ये एका ४० वर्षांच्या महिलेने आपल्या प्रियकरासाठी नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या महिलेला पाच मुलं आहेत. आरोपी महिलेने नवऱ्याची हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहराही जाळला. 

फोन टॅपिंगच्या चौकशीवरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत दुमत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चा लाल असे या प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या पतीचे नाव आहे. सहा फेब्रुवारीला सोनिया विहारजवळील यमुना किनारी एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून आणि जाळून टाकण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्यावर संबंधित मृत व्यक्ती उत्तर प्रदेशमधील बलिया येथील गंगोली गावातील राहणारा असल्याचे दिसून आले. तेथून माहिती मिळाली की तो गाझियाबादमधील कृष्णविहारमध्ये आपल्या कुटूंबासोबत राहतो.

काश्मिरचे माजी सनदी अधिकारी शाह फैजल यांच्यावर मोठी कारवाई

पोलिसांनी तिथे जाऊन तपास केल्यावर मृत व्यक्तीच्या पत्नीचे वकील नावाच्या एका युवकाशी विवाहबाह्य संबंध आहेत, हे उघडकीस आले. वकील हा बच्चा लाल सोबतच काम करीत होता. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध समजल्यावर बच्चा लाल एकटा सोनिया विहारजवळ येऊन राहू लागला. त्याने आपल्या घरी पैसे देणे बंद केले. बच्चा लालने कृष्ण विहारमध्ये एक प्लॉटही विकत घेतला होता. याच प्लॉटचा ताबा घेण्यासाठी त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने त्याची हत्या केली.