पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विवाहबाह्य संबंधातून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, बेडखाली लपवला मृतदेह

आईकडून मुलाची हत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्या अडीच वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या करून त्याचा मृतदेह घरातील बेडखालील रिकाम्या जागेत लपवून ठेवणाऱ्या २२ वर्षांच्या आईला अटक करण्यात आली. याच महिलेने २०१७ मध्ये आपल्या पोटच्या मुलीचीही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. विवाहबाह्य संबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज असून, या घटनेमध्ये संबंधित महिलेचा लग्नापूर्वीचा प्रियकरही सहभागी असण्याची शक्यता आहे. पंजाबमधील बुरैल गावामध्ये ही घटना घडली. रूपा असे या महिलेचे नाव आहे.

कोरोना विषाणू : महाराष्ट्रात सहा संशयित रुग्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाचे दशरथशी २०१६ मध्ये लग्न झाले. दशरथ इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. लग्नानंतर २०१७ मध्ये त्यांना एक मुलगा झाला. या मुलाचे नाव दिव्यांशू होते. त्यानंतर २०१९ मध्ये या दोघांना एक मुलगी झाली. तिचे नाव कोमल ठेवण्यात आले होते. पण २०१९ मध्ये जन्मानंतर काही महिन्यांतच कोमलचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

यावर्षी २५ जानेवारीला कामावरून परत आल्यावर घरात रुपा आणि दिव्यांशू नसल्याचे दशरथच्या लक्षात आले. या प्रकरणी त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रविवारी घरामध्ये एक वस्तू शोधताना त्याने बेडचा वरचा भाग उचलला. त्यावेळी आतील रिकाम्या जागेमध्ये त्याला दिव्यांशूचा मृतदेह दिसला.

दशरथने लगेचच त्याल शासकीय रुग्णालयात नेले. पण तिथे उपचारांपूर्वीच दिव्यांशूला मृत घोषित करण्यात आले. यानंतर दशरथने आपल्या पत्नीविरोधात हत्येची तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुपाचा शोध घेऊन सोमवारी तिला अटक केली.

डोनाल्ड ट्रम्प २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान भारतात येण्याची शक्यता

आपल्याशी लग्न झाल्यापासून रुपा आनंदी नव्हती. तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्यात आले होते, असे दशरथने पोलिसांना सांगितले. लग्नानंतर या दोघांमध्ये वाद होत होते, अशीही माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे रूपाने दशरथचे संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच तिने आपल्या दोन्ही मुलांना मारून टाकले. तिच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून रुपाच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराचीही चौकशी करण्यात येणार आहे.