पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक देश-एक निवडणूक: 'बहुतांश पक्षांचे समर्थन, समिती नेमणार'

सर्वपक्षीय बैठकीनंतर बाहेर पडताना पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळातील सदस्य (Sonu Mehta/ HT photo)

'एक देश एक निवडणूक'च्या मुद्यावरुन एक समिती बनवली जाईल. ही समिती सर्व पक्षांशी चर्चा करुन आपला अहवाल देईल, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत झाला असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. या बैठकीला २४ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. बहुतांश सर्वच पक्षांनी एक देश एक निवडणुकीच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिल्याचेही ते म्हणाले. 

'एक देश, एक निवडणूक'वर मोदी सरकारने संसदेत चर्चा 

राजनाथ सिंह म्हणाले की, 'बैठकीत फक्त डाव्या पक्षांनी याच्या अंमलबजावणीवरुन शंका व्यक्त केली. पण त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे.' या बैठकीला ४० पक्षांना बोलावले होते. काँग्रेस, सपा, बसपा, आप, टीएमसीसारख्या आणखी काही पक्षांनी या बैठकीत सहभाग नोंदवला नाही.

याप्रकरणी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. ही समिती निर्धारित वेळेत विविध पक्षांशी चर्चा करुन सूचना करेल. समिती गठीत करण्याचे काम पंतप्रधान करतील.

मोदींच्या 'एक देश एक निवडणूक'ला नवीन पटनाईकांचे समर्थन

राजनाथ सिंह म्हणाले की, हा सरकारचा अजेंडा नाही, हा देशाचा अजेंडा आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाऊ. जर विचारात मतभेद असतील तर त्याचा सन्मान केला जाईल. बैठकीत २१ पक्षांचे अध्यक्ष उपस्थितीत होते. तर ३ पक्षाच्या अध्यक्षांनी व्यस्ततेमुळे बैठकीत येण्यास असमर्थता दर्शवली. यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व सूचनांचे स्वागत केले.