पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांच्या वर, मृत्यूही २५ हजारहून अधिक

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांच्या वर, मृत्यूही २५ हजारहून अधिक (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेत कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे २५ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनिअरिंगने (सीएएसी) याची माहिती दिली आहे. 

देशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

सिन्हुआ या वृत्तसंस्थेने सीएएसीने जारी केलेल्या नवीन आकडेवारीच्या हवाल्याने म्हटले की, देशात मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६.५० पर्यंत कोविड-१९ संक्रमिक रुग्णांची संख्या ६,०२,९८९ इतकी आहे. तर या विषाणूमुळे २५,५७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे बाधित अमेरिकेतील सर्वांत प्रभावित राज्य न्यूयॉर्कमध्ये एकूण १०,८३४ मृत्यूसह २,०२,६३० प्रकरणे समोर आले आहेत. त्यानंतर न्यूजर्सीत ६८,८२४ प्रकरणांसह एकूण २८०५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जूने सामने पाहून कंटाळलोय! खेळ पुन्हा सुरु करायला हवा :ट्रम्प

तरस मॅसाच्युएट्स, मिशिगन, पेनिसेल्व्हिेनिया, कॅलिफोर्निया, इलिनॉस आणि लुईझाना या राज्यातून २० हजारहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:More than six lakhs coronavirus patients in america around 25 thousand deaths so far from covid 19