पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपला टाटा ट्रस्टकडून ३५६ कोटींची देणगी, वर्षभरात मिळाले ७०० कोटी

भाजप

भाजपला वर्ष २०१८-१९ दरम्यान टाटा समूहाद्वारे नियंत्रित एका निवडणुकीच्या विश्वस्थ संस्थेकडून ३५६ कोटींची देणगी देण्यात आली आहे. सत्तारुढ पक्षाने ही माहिती निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रात दिली आहे. भाजपकडून निवडणूक आयोगाला ३१ ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार पक्षाला आर्थिक वर्ष २०१८-१९ दरम्यान धनादेश आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण ७०० कोटी रुपयांहून अधिक देणगी देण्यात आली. यातील सुमारे ३५६ कोटी रुपये टाटा समूहाकडून नियंत्रित 'प्रोग्रेसिव इलेक्ट्रोल ट्रस्ट'कडून देण्यात आले आहेत.

मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट: दिग्विजय सिंह

निवडणूक आयोगाला मिळालेल्या दस्तऐवजानुसार, भारतातील सर्वांत श्रीमंत ट्रस्ट असलेल्या 'द प्रूडंट इलेक्ट्रोल ट्रस्ट'ने भाजपला ५४.२५ कोटी रुपयांची देणगी दिली. या विश्वस्थ संस्थेला भारती समूह, हिरो मोटोकॉर्प, ज्युबिलंट फूड वर्क्स, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्ससारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचा पाठिंबा आहे. या दस्तऐवजातील माहिती ही २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची देणगी जी धनादेश आणि ऑनलाइन पद्धतीने देण्यात आलेली त्याचाच समावेश करण्यात आलेला आहे.

मित्र पक्षाच्या अट्टाहासामुळेच राष्ट्रपती राजवट : मुनगंटीवार

निवडणूक रोखेंच्या माध्यमातून प्राप्त निधीचा यात समावेश नाही. दस्तऐवजात म्हटले आहे की, भाजपशी निगडीत व्यक्ती, कंपनी आणि निवडणूक विश्वस्थ संस्थांकडूनही देणगी मिळालेली आहे. निवडणूक संहितेनुसार राजकीय पक्षांसाठी आर्थिक वर्षादरम्यान मिळणाऱ्या सर्वप्रकारच्या देणगींचा खुलासा करणे आवश्यक आहे. सध्या राजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांच्या नावांचा खुलासा करण्याची गरज नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला उल्लू बनवतोय : नारायण राणे