पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'CAA नंतर भारतातून बांगलादेशला परतणाऱ्या अवैध प्रवाशांची संख्या वाढली'

CAA नंतर भारतातून बांगलादेशला परतणाऱ्या अवैध प्रवाशांची संख्या वाढली- बीएसएफ

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर मागील एक महिन्यात स्वदेशी परतणाऱ्या अवैध बांगलादेशी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली असल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी म्हटले आहे.  सीएएच्या अंमलबजावणीनंतर अवैध प्रवाशांमध्ये भीतीपोटी मायदेशी परतण्याचे प्रमाण वाढले आहे, असे बीएसएफच्या एका उच्च अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

NRC, NPR नंतर आता NBRवर सरकारचा विचार सुरु

बीएसएफचे महानिरीक्षक (प.बंगाल फ्रंटियर) वाय बी खुरानिया म्हणाले की, मागील एक महिन्यात सीमावर्ती देशात जाणाऱ्या अवैध बांगलादेशी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आम्ही केवळ जानेवारीत २६८ अवैध बांगलादेशी प्रवाशांना पकडले. यातील बहुतांश लोक शेजारी देशात जाण्याचा प्रयत्न करत होते. ९० टक्के लोक भारत सोडून बांगलादेशमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. 

NZvsIND : राहुल-विराटनं पाया रचला अन् श्रेयसने विजयाचा कळस चढवला!

गुरांच्या तस्करीचे प्रमाणही कमी झाल्याचे बीएसएफला आढळून आले आहे. ते म्हणाले, २०१९ मध्ये मादक पदार्थ, विशेषतः याबा टॅबलेटच्या तस्करीत वाढ झाली होती. जानेवारीमध्ये १० हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या (एनसीआरबी) ताज्या आकडेवारीनुसार, बांगलादेशमधून भारताची सीमा पार करताना पकडण्यात येणाऱ्या लोकांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये बीएसएफने २९७१ लोकांना अटक केली. तर २०१७ मध्ये १८०० लोकांना अटक करण्यात आली होती.

कोरोना विषाणू: मुंबईत आढळले दोन संशयित रूग्ण