पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मान्सून ४ जूनला भारतात दाखल होणार

यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता

दरवर्षी १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा ४ जूनला भारतात दाखल होणार आहे, असा अंदाज स्कायमेट या हवामान अभ्यास संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी चार दिवस अधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. एवढेच नाही तर सामान्यपेक्षा यंदा कमी पाऊस पडेल, असेही या संस्थेने म्हटले आहे.  

अरेरे! मुंबईत वरुणराजाचे उशीराने आगमन, स्कायमेटचा अंदाज

स्कायमेट हवामान अभ्यास संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे देशात सर्वसामान्य कमी पाऊस पडेल. यात पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतासह उत्तर पश्चिम आणि दक्षिण भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाची दिर्घकालीन सरासरी ९३ टक्के इतकी असेल. ९० ते ९५ टक्के पाऊस हा सामान्यपेक्षा कमी श्रेणीत मोडतो. जर हा पूर्व अंदाज खरा ठरला तर सामान्यपेक्षा कमी मान्सूनचे हे सलग दुसरे वर्ष ठरेल.