पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नैऋत्य मान्सून परतला, यंदा १० टक्के अधिक बरसला!

मान्सून परतला

सर्वसाधारण वेळेपेक्षा आठवडाभर उशीराने (८ जून) केरळमध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मान्सूनने १६ ऑक्टोबरला म्हणजे सर्वसाधारण वेळेपेक्षा (१५ ऑक्टोबर) फक्त एक दिवस उशीराने अखेर निरोप घेतला आहे. मान्सून हंगामात या वर्षी सरासरीपेक्षा १० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. नैऋत्य मान्सूनने देशाचा निरोप घेतल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनला सुरुवात झाल्याचे आयएमडीने जाहीर केले आहे.

..ही तर पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचा राणेंवर

मान्सून माघारी फिरला असला तरी १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीच्या जीएफएस मॉडेलमधून दिसून येत आहे. कोकणात मध्यम ते जास्त, तर मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.