पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ म्हणजे देशावरील काळा डाग'

मायावती

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ म्हणजे केवळ भाजपवरचा नव्हे तर देशावरील काळा डाग असल्याची जळजळीत टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बुधवारी केली. त्यांनी आपल्या टीकेतून नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून मायावती यांच्या कार्यकाळापेक्षा आपण जास्तवेळ गुजरातचे मुख्यमंत्री होतो, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. 

'नीच माणूस' या पंतप्रधान मोदींवरील टीकेवर मणिशंकर अय्यर ठाम

मायावती म्हणाल्या, ज्यावेळी उत्तर प्रदेशात आमचे यांचे शासन होते. त्यावेळी उत्तर प्रदेश हिंसाचार आणि एकाधिकारशाहीमुक्त होता. पंतप्रधान जरी आमच्या पक्षाला 'बहेनजी की संपत्ती पार्टी' म्हणून हिणवत असले, तरी आम्ही सरकारपासून काहीही लपवलेले नाही. आम्हाला जे काही मिळाले आहे ते आमच्या शुभेच्छूकांनीच दिले आहे. मोदींनी टीका करताना सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत, असेही मायावती म्हणाल्या.

दरम्यान, मंगळवारी मायावती यांनी केलेल्या टीकेमध्ये त्यांनी, नरेंद्र मोदी यांची नाव आता बुडायला लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांना मदत करणे बंद केले आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे यावेळी संघाचे स्वयंसेवकही प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसत नाहीत. त्यामुळे मोदी नाराज झाले आहेत, असे म्हटले होते. आता परत एकदा त्यांनी मोदींवर टीका केली.

तिसरी आघाडी शक्य नाही, स्टॅलिन यांचे मत

राजस्थानमधील अलवारमध्ये दलित समाजातील एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर नरेंद्र मोदी यांनी मायावती यांच्यावर निशाणा साधला होता. मायावतींमध्ये खरेच हिम्मत असेल, तर त्यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढून दाखवावा, असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.