पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींचे अच्छे दिन संपले, वाईट दिवस सुरू - मायावती

मायावती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन संपले असून, लवकरच त्यांचे वाईट दिवस सुरू होणार असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केली. उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये प्रचारसभेत त्यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सुद्धा उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांतील मतदानातून सपा-बसपा महाआघाडीची स्थिती दिवसेंदिवस सुधारत असल्याचेच दिसून आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

..म्हणून मायावतींचे राहुल, सोनिया गांधींना मतदान करण्याचे आवाहन

लोकसभेच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील दोन टप्प्यांमध्येही आम्हाला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल, असे मायावती यांनी म्हटले आहे. जेव्हापासून उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदलाची आघाडी झाली आहे. तेव्हापासून भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांची झोपच उडाली आहे. आझमगढमधून अखिलेश यादव ऐतिहासिक विजय मिळवतील, असे भाकीत मायावती यांनी केले.

समाजवादी पक्षाकडून मायावतींची फसवणूक, मोदींचा आरोप

नरेंद्र मोदी हे सपा-बसपा महाआघाडीला कायम महामिलावटी आघाडी म्हणतात. त्यावर आम्ही महामिलावटी नसून, नरेंद्र मोदी हेच महामिलावटी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसवरही जोरदार टीका केली. नरेद्र मोदी आपल्या भाषणांमधून महाआघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण मतदारांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.