पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये तयार होणार 'मोदी मार्ग'

पंतप्रधान मोदी आणि  बेअर ग्रिल्स

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पर्यटन विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन 'मोदी मार्ग' विकसित करणार आहेत. डिस्कव्हरी वाहिनीवरील 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमा दरम्यान मोदींनी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील ज्या-ज्या मार्गावरुन प्रवास केला त्या मार्गाला मोदीचे नाव देण्यात येणार आहे. 

अजिंक्य रहाणेनंतर सचिन तेंडुलकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आला धावून
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉर्बेट नॅशनल पार्कमधील रोमांचकारी प्रवासाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पर्यटन विभाग भारावून गेले आहे. ही राज्याच्या पर्यटनासाठी मोठी कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे. पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी मंगळवारी सांगितले की, जिम कार्बेट नॅशनल पार्कची स्वत:ची विशिष्ट ओळख आहे. 

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढू: चंद्रकांत पाटील

'नरेंद्र मोदी डिस्कव्हरी वाहिनीवरील 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे कॉर्बेट नॅशनल पार्कमधील वन्य जीवांच्या रोमांचकारी जगाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. या कार्यक्रमानंतर जगभरातील पर्यटक वन्य जीव पर्यटनाकडे आकर्षित होणार', असल्याचे सतपाल महाराज यांनी सांगितले.  

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र' पुरस्कार

दरम्यान, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉर्बेट नॅशनल पार्कच्या संपूर्ण मार्गावर निर्भयता आणि धैर्य दाखवले. याला राज्य पर्यटन विभाग एक ओळख बनवू इच्छित आहे. या कार्यक्रमा दरम्यान मोदी ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या पूर्ण परिसराला आणि मार्गाला मोदींचे नाव दिले जाणार आहे. जेणेकरुन कार्बेट नॅशनल पार्क फिरायला येणारे पर्यटक तोच रोमांचकारी प्रवास अनुभवु शकतील', असे देखील सतपाल महाराज यांनी सांगितले.  

मोदी-शहांचे कौतुक करणाऱ्या रजनीकांत यांच्यावर ओवेसींची टीका