पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही कोणत्याही मतभेदाशिवाय सरकार बाहेर : नितीश कुमार 

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा स्थापन होत असलेल्या सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचा समावेश नाही. मोदींच्या शपथविधी समारोहापूर्वी जेडीयू सरकारमध्ये सहभागी नसल्याचे समोर आले.  सरकारमध्ये सहभागी नसून देखील ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) कायम राहणार आहेत.

Modi's Swearing in Ceremony:  मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला लोकसभा निवडणुकीत १६ जागा मिळाल्या होत्या. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी कॅबिनेटमध्ये संधी मिळणाऱ्या नेत्यांची भेट घेतली होती. यावेळी जेडीयूचा एकही नेता उपस्थित नव्हता. जेडीयूकडून आरसीपी सिंह आणि रामचंद्र प्रसाद सिंह हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र हे नेते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उपस्थित राहिले नाहीत. 

कष्टाचे फळ!, नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा
 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही. जेडीयू सरकारमध्ये सहभागी व्हायलाच हवे असा आमचा अट्टाहास नाही. कोणत्याही मतभेदाशिवाय आम्ही सरकारमधून बाहेर राहणार आहोत." आम्ही सरकारमध्ये सहभागी नसलो तरी एनडीएसोबत कायम राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.