पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदीजी लष्कर अन् धर्माच्या नावाने दिशाभूल करताहेत'

नरेंद्र मोदी

लष्कराचा वापर, धार्मिकता आणि देशभक्तीच्या नावाखाली मोदीजी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. राहुल गांधी यांची भेटीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास, अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मुद्यावर अजिबात बोलत नाहीत, असा उल्लेख करत गहलोत यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. दिल्लीमध्ये सोमवारी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर गेहलोत यांनी एएनआयशी संवाद साधला.

आता GST आकारणीचे दोन स्लॅब शक्य - अरूण जेटली

सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्व करु शकतात. देश आणि नागरिकांच्या हिताप्रति त्यांची निष्ठा अजोड आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी राहुल गांधींना भेटण्यापूर्वी दिली होती. राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राहुल गांधींनी प्रथमच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या महत्वाच्या बैठकीपूर्वी गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Modi ji did politics hiding behind the Army misled people in the name of religion Says Rajasthan CM Ashok Gehlot