पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

माईक पॉम्पिओ आणि नरेंद्र मोदी

काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची 'मोदी है तो मुमकीन है' घोषणा देशभर गाजली होती. या घोषणेचा परिणामही झाल्याचे निवडणुकीच्या निकालांवरून पाहायला मिळाले. निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळाली. पण याच घोषणेमुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे सुद्धा प्रभावित झाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणामध्ये या घोषणेचा उल्लेख करून भारत आणि अमेरिकेतील संबंध पुढच्या स्तरावर नेणेही आता शक्य होणार असल्याचे म्हटले आहे.

निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले - सोनिया गांधी

भारत-अमेरिका व्यवसाय परिषदेच्या संमेलनात बीजभाषण करताना माईक पॉम्पिओ म्हणाले, जसे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील प्रचारात म्हटले होते की 'मोदी है तो मुमकीन है', त्याचप्रमाणे उभयदेशांमधील संबंध नव्या स्तरावर नेण्यास मी आशावादी आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी काही कल्पनाही त्यांनी आपल्या भाषणात मांडल्या. दोन्ही देशांतील नागरिकांच्या भल्यासाठी भारत आणि अमेरिकेने एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 

माईक पॉम्पिओ या महिन्याच्या अखेरिस भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. २४ ते ३० जून या काळात माईक पॉम्पिओ भारत, श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांचा दौरा करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात पाकिस्तानमधील दहशतवादाला अमेरिकेने कठोरपणे विरोध केला आहे. त्याविरोधात पावलेही उचलली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.