पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहेरी तलाक विधेयकावरून तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य भूमिकेने भाजपला फायदा

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे.

तिहेरी तलाक मुद्द्यावर तृणमूल काँग्रेसकडून घेतल्या जाणाऱ्या संभाव निर्णयावरून सत्ताधारी भाजपला हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मदत होणार आहे, असे दिसते. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून आपल्या पक्षाची रणनिती काय असावी, याबद्दल सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. दोन पर्यायांवर सध्या विचार केला जातो आहे. त्यापैकी एक म्हणजे राज्यसभेत ज्यावेळी हे विधेयक मतदानासाठी येईल, त्यावेळी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकणे किंवा मतदानावेळी सभात्याग करणे यावर विचार करण्यात येत आहे. 

तृणमूल काँग्रेसने वरील पैकी कोणताही एक निर्णय घेतला, तरी त्याचा फायदा सत्ताधारी भाजपलाच होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. 

दोन बायकांमधील भांडणाला वैतागून नवऱ्याने केले घृणास्पद कृत्य

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विधेयकाला पूर्णपणे विरोध करण्याचे काम तृणमूल काँग्रेस करणार नाही. कारण तसे केल्यास भाजपकडून तृणमूल काँग्रेस मुस्लिमांचे लांगूलचालन करते आणि हा पक्ष हिंदूविरोधी असल्याचा प्रचार केला जाऊ शकतो. कोणत्याही स्थितीत हिंदू विरोधी असा शिक्का स्वतःवर मारून घेण्यास तृणमूल काँग्रेस तयार नाही. यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर सध्या या विधेयकावर नक्की काय भूमिका घ्यायची यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतरच विधेयकावर पक्षाने तटस्थ राहावे, असे निश्चित करण्यात आले आहे. पण कशा पद्धतीने तटस्थ राहावे, हे अद्याप निश्चित झालेले नाही.