पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी मोदी सरकारची केली ब्रिटिशांशी तुलना

राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच राहुल गांधी आक्रमक अंदाजात दिसून आले. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी मोदी सरकारची तुलना ब्रिटिश काळाशी केली. संविधानासाठी लढाई लढण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस खासदारांना केले. तसेच तुम्हाला देशातील कोणत्याही संस्थेचे सहकार्य मिळणार नाही, पुन्हा एकदा लढून जिंकायचे आहे, असे ते म्हणाले. याबाबत 'एएनआय'ने वृत्त दिले आहे.

तुम्हाला देशातील कोणतीही संस्था सहकार्य करणार नाही. कोणीही तुम्हाला पाठिंबा देणार नाही. हे ब्रिटिशांच्या काळासारखे आहे. जेव्हा कोणत्याही संस्थेने पाठिंबा दिला नाही. तेव्हाही आपण लढलो आणि जिंकलो. आपण पुन्हा एकदा विजय मिळवू, असा आत्मविश्वास राहुल यांनी व्यक्त केला. भाजपला आमचे ५२ खासदार लढत देतील असेही ते म्हणाले. 

काँग्रेस लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही

संसदीय दलाच्या बैठकीत काँग्रेस खासदारांनी सर्वसंमतीने सोनिया गांधी यांना संसदीय दलाच्या नेतेपदी निवडले. दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. परंतु, काँग्रेस कार्यसमितीने त्यांचा राजीनामा फेटाळला होता.

दरम्यान, लोकसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. गेल्या लोकसभेत काँग्रेसचे अवघे ४४ खासदार होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला नव्हता. यावेळीही विरोधी पक्षासाठी आवश्यक संख्येपेक्षा कमी खासदार असल्यामुळे काँग्रेस दावा करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता घटनेच्या रक्षणासाठी लढतोय हे लक्षात ठेवा - राहुल गांधी