पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२०१४ सारखा मोदी फॅक्टर आता नाही : दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह

मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरविले आहे. त्यांची लढत भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी होते आहे. या पार्श्वभूमीवर 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिग्विजय सिंह यांनी २०१४ सारखा मोदी फॅक्टर सध्या नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. उलट काही जागांवर भाजपसाठी ही जबाबदारी ठरली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Exclusive | सुटीसाठी युद्धनौकेवर कोणी का जाईल?: राहुल गांधी

१९८४ पासून भोपाळ लोकसभेची जागा कायम भाजपकडेच आहे. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह म्हणाले, मला आव्हाने स्वीकारायला आवडतात. १९८४ मध्ये मी राजगढमधून निवडणूक लढलो होतो. १९५२ पासून ती जागाही काँग्रेसने कधीच लढली नव्हती. भोपाळ लोकसभा मतदारसंघाचा मी पूर्ण दौरा केला आहे. या मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघात २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. तर तीन ठिकाणी काँग्रेस विजयी ठरला आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीबद्दल दिग्विजय सिंह म्हणाले, माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल, हे मी ठरवू शकत नाही. आता भाजपने त्यांचा सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडला आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की त्या भाजपच्या सदस्य कधीच नव्हत्या. माझ्याविरुद्ध लढण्यासाठी भोपाळमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळेच त्यांनी दुसरीकडून उमेदवार आयात केला आहे. कडव्या हिंदूत्ववादी व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. एवढेच गणित त्यांच्याकडे आहे.

तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये पडद्यामागे बोलणी, त्रिशंकू लोकसभेनंतरची तयारी

मी भाजपच्या धोरणाबद्दल जास्त बोलणार नाही. मी भोपाळबद्दलच बोलेन. मला भोपाळसाठी जे काही करायचे आहे ते मी माझ्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये लिहिले आहे. प्रत्येक मतदारसंघ वेगळा असतो. त्यामुळे सगळीकडे एकसारखे धोरण अवलंबून चालत नाही. उदाहरणार्थ सिद्धीची बरोबरी भोपाळबरोबर होऊ शकत नाही. तर मोरैनाची बरोबरी सिद्धीशी होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.