पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मूत ५ जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण वातावरण


जम्मू परिसरातील ५ जिल्ह्यात रविवारी सकाळपासून मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यापूर्वीपासून काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणची २ जी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ४ ऑगस्टपासून बंद असणारी इंटरनेट सेवा शुक्रवारपासून पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आली होती. मात्र २४ तास उलटल्यानंतर ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली.  

एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,  काही कारणास्तव मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. परिस्थितीच्या पाहणीनंतर सेवा पूर्ववत करण्यात येईल, असा उल्लेखही त्यांनी केला. जिल्हा प्रशासन जम्मू काश्मीर आणि लडाखमधील परिस्थितीवर बारिक नजर ठेवून आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर संदेश पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.  

आता चर्चा फक्त POKवरच, राजनाथ सिंह यांनी ठणकावलं

राजौरी जिल्ह्यातील कलम १४४ अंतर्गत लागू करण्यात आलेली जमाव बंदी हटवण्यात आली आहे. मात्र रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत निर्बंध लागू आहेत.   उल्लेखनिय आहे की, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आले होते.    

एका आठवड्यामध्ये जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होईल.राज्यातील १४४ कलम अंतर्गत लागू करण्यात आलेली जमाव बंदी हटवण्यात येईल. तसेच सोमवार पासून सर्व शिक्षण संस्था खुल्या होतील, असे  केंद्रीय गृह राज्य मंत्री जी कृष्ण रेड्डी यांनी शनिवारी  कारगिल स्पोट्र्स महोत्सवाच्या कार्यक्रमात सांगितले होते.   

भारत ऐतिहासिक बदलातून जात आहे, भूतानमध्ये पंतप्रधान