पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॉब लिंचिंग: मुलं चोरीच्या संशयावरुन तृतीयपंथीची हत्या

शहापूर हत्या प्रकरण

राजस्थान, बिहार, झारखंडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या जलाईगुडीमध्ये जमावाने तृतीयपंथीची बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

इंग्लंडच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन, बुधवारी औपचारिक पदग्रहण

जलाईगुडी येथे एक तृतीयपंथी फिरत होता. मुलं चोरी करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याच्या संशयावरुन जमावाने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी काही लोकांनी तृतीयपंथीचा पाठलाग केला. त्यानंतर सर्व लोकांनी एकत्र येत त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये संतप्त जमाव तृतीयपंथीला मारहाण करताना दिसत आहे. 

... तर नरेंद्र मोदी यांनी देशहिताला धोका दिला - राहुल गांधी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. जमावाने तृतीयपंथीयाला मारहाण करुन हत्या केली होती. त्यानंतर काही लोकांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरावरील अनेक गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपपत्र मुंबई सत्र 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांमध्ये अफवा पसरल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचले आहे. कारण या परिसरामध्ये याआधी मुलं चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याप्रकरणी ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार