पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट

राज ठाकरेंनी घेतली सोनियांची भेट

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची घेतलेली भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीमध्ये नक्की कोणती चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

EVM विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतरची 'राज की बात'

यापूर्वी राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत देशातील निवडणुका या मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राज ठाकरे यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. या प्रचारसभेपासूनच राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली होती.