पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जमैकाची टोनी मिस वर्ल्ड, भारताची सुमन तिसऱ्या स्थानी

मिस वर्ल्ड २०१९-  टोनी अ‍ॅन सिंह

जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंहने मिस वर्ल्ड-२०१९ चा किताब पटकावला आहे. मिस फ्रान्स ओपेली मेजिनो दुसऱ्या तर मिस इंडिया सुमन राव तिसऱ्या स्थानी राहिली. ६९ वी मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी लंडनमध्ये पार पडली. एकूण ११४ स्पर्धकांमध्ये टोनीने बाजी मारली.

फडणवीसांच्या त्या शपथविधीनंतर 'शॉक' बसलाः पंकजा मुंडे

मिस वर्ल्ड २०१९ च्या अंतिम फेरीत २३ वर्षीय टोनी अ‍ॅन सिंहने अमेरिकन गायक व्हिटनी ह्यूस्टनचे गाणे गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा मिस यूनिव्हर्स आणि मिस वर्ल्डचा किताब कृष्णवर्णीय सौंदर्यवतींना मिळाला आहे.

'राहुल यांच्यासाठी 'जिना' हेच आडनाव उपयुक्त', भाजप आक्रमक

टोनीने फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती कॅरेबियन विद्यार्थी संघटनेची अध्यक्षही होती. मिस वर्ल्डचा किताब मिळवण्यात टोनीच्या आईचे मोठे योगदान आहे. आघाडीच्या पाच जणांमध्ये मिस फ्रान्स, जमैका, भारत, ब्राझील आणि नायजेरियाच्या सौंदर्यवती होत्या. राजस्थानची सुमनराव तिसऱ्या स्थानी राहिली.

शिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Miss World 2019 Jamaica Toni Ann Singh Become Miss World 2019 India Suman Rao Receive Third Position in London