पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BSP नेत्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

अल्पवयीन मुलीवर नेत्याने बलात्कार केल्याचा आरोप (प्रातिनिधीक छायाचित्र)

बसपा नेत्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. नेत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला तसेच त्यांनी अश्लील व्हिडिओ तयार केल्याचेही महिलेने म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस उपाधीक्षक (नोएडा) विमल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीनुसार, नोएडा सेक्टर १०८ मधील बसपा नेते दयाराम जाटव यांच्या कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

धक्कादायक: धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग हिसकावली

तक्रारदार महिला या ठिकाणी कामासाठी होती. ती आपल्या पती आणि १३ वर्षांच्या मुलीसह याच ठिकाणी राहत होती. बसपा नेता सामान वैगेरे  आणण्याच्या बहाण्याने आम्हाला बाहेर पाठवायचा. त्याने माझ्या मुलीवर बलात्कार केला. नेत्यासोबत असलेल्या त्याच्या भाचा आणि अन्य काही लोकांनीही मुलीवर बलात्कार केला. याचा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला, असा आरोप महिलेने तक्रारीमध्ये केला आहे.

चंद्रपूरातील वैणगंगा नदीत बोट बुडाली; दोघांचा मृत्यू

आरोपी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही महिलचे म्हणने आहे, अशी माहितीही पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.  बसपा नेत्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मला फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही लोकांसोबत पैशाच्या व्यवहारातून वाद सुरु आहेत. त्यांनीच माझ्याविरोधात हा कट रचला आहे, असे बसपा नेत्याने म्हटले आहे.