केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आयुष मंत्रालयाकडून गोमूत्रावर औषधं तयार करण्याचे काम सुरु असल्याचे म्हटले आहे. गोमूत्रापासून अनेक प्रकारची औषधं तयार होतात. कर्करोगासारख्या असाध्य आजारावरील औषधंही गोमूत्रापासून तयार होते. यासाठी केंद्र सरकारने गोसंवर्धन आणि गोपालनासाठी काही पावलं उचलली आहेत, असेही चौबे यांनी सांगितले. ते तामिळनाडूतील कोईमतूर येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
'पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्नशील आहोत'
#WATCH Ashwini Choubey, Minister of State for Health: Several medicines are prepared today using cow urine, including the medicines for Cancer. Our Ayushman Ministry is also working on this. pic.twitter.com/OD3nWEj9ta
— ANI (@ANI) September 7, 2019
ते म्हणाले, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (जेएवायई) कर्करोगाचा समावेश करण्याच्या एका प्रस्तावावर आरोग्य मंत्रालय विचार करत आहे. या योजनेत कर्करोगाचा आतापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. यावर बोलताना ते म्हणाले की, केंद्र एका वेगळ्या योजने अंतर्गत सध्या तीन प्रकारच्या कर्करोगावर उपचार देत आहे. आता जेएवायईअंतर्गत या घातक आजाराचा समावेश करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास केला जात आहे. ते श्री रामकृष्ण रुग्णालयात 'कर्करोगाविरोधात लढाई' अभियानाचा शुभारंभ करण्यास आले होते.