पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली गारठली; २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

दिल्ली गारठली

राजधानी दिल्ली चांगलीच गारठली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी कमी होत चालले आहे. दिल्लीतील थंडीने १२० वर्षात पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटाने तापमान २.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.

काँग्रेसचा स्थापना दिवस; देशभरात 'संविधान वाचवा' रॅलीचे आयोजन

याआधी, शुक्रवारी दिल्लीमध्ये किमान ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आयानगरमध्ये ३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दिल्लीमध्ये यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचे सांगितले जात आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी दिल्लीकरांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत.

घाटकोपरच्या अग्नितांडवात दोघांचा मृत्यू; आगीवर नियंत्रण

दिल्लीकरांना रविवारपर्यंत थंडीचा कहर सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, उद्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार किमान तापमान ४ अंश सेल्सिअसपर्यंत असू शकते. तसंच, हवामान विभागाने पुढे असे सांगितले की, उत्तर भारतात येणाऱ्या दिवसांत तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आणखी वाढणार आहे. तसंच, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. 

पुणे मेट्रोच्या कोचचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण