पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचित आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब, एमआयएमचा 'एकला चलो रे'

एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये युतीसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र दोन्ही पक्षामध्ये युती होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांनी घेतला निर्णय पक्षाचा अंतिम निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. हैद्राबाद येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 

पक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढत युती होणार नसल्याचा खुलासा केला होता. या प्रसिध्दी पत्रकामध्ये त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नसल्याचे सांगितले होते. तसंच प्रकाश आंबेडकरांनी फक्त एमआयएमला ८ जागांची ऑफर दिली. जी आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही युती न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जलील यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. 

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

मात्र जोपर्यंत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी अंतिम निर्णय सांगत नाही तोपर्यंत युती कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. एमआयाएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. जोपर्यंत ते निर्णय देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील एमआयएम नेते काय विचार करतात याचा आम्हाला काहीच फरक पडत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. अखेर आज ओवेसी यांनी जलील यांनी घेतलेला निर्णय पक्षाचा अंतिम निर्णय असल्याचे स्पष्ट केेले आहे.

'घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका, देतो राजीनामा...'

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे २८८ जागांपैकी १०० जागा मागितल्या होत्या. त्यानंतर एमआयएमने ७५ जागा मागितल्या. त्यानंतर ५० जागा मागितल्या. जागा वाटपाबाबतचे सर्व अधिकार खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे होते. मात्र जलील यांनी जागेबाबत दिलेला प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी मान्य नाही केला. फक्त ८ जागा देण्यास प्रकाश आंबेडकर तयार झाले. जलील यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला. 

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न