पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आकडे दाखवून लोकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प: इम्तियाज जलील

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, आजचा अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्ने असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.  

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांना माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'सत्तेत येऊन भाजपला ६ वर्ष झाले. त्यांनी काय केले हे सर्वांना माहिती आहे. रुग्णालयाची, शेतकऱ्यांची सध्या अवस्था काय आहे हे सर्वांना माहिती आहे. पण फक्त आकडे दाखवायचे काम हे सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

Union budget 2020: संरक्षण क्षेत्रात किरकोळ वाढ, ३.३७ लाख कोटींचे

दरम्यान, 'हे आकडे पाहून लोकांना वाटत असेल की अरे वा सरकार किती चांगले काम करत आहे. पण हे सरकार आकडे दाखवून लोकांची दिशाभूल करत आहे. लोकांना फक्त आकडे आणि स्वप्न दाखवणारा आजचा अर्थसंकल्प आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. 

भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस