पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही; भागवतांच्या वक्तव्यांवर ओवेसीचे प्रत्युत्तर

असदुद्दीन ओवैसी

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात मिळतील या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. ओवैसी यांनी ट्विट करत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. मोहन भागवत यांनी भारत हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले होते. त्यावर ओवैसी यांनी टीका करत भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता आणि नाही राहणार', असे म्हटले आहे.

निवडणूक प्रचाराचा धडाका सुरु; 'या' ठिकाणी होणार दिग्गजांच्या सभा

ओवेसी यांनी रविवारी ट्विट करत मोहन भागवत यांचे नाव लिहित असे म्हटले की, 'मोहन भागवत भारताला हिंदू राष्ट्र सांगून आमचा इतिहास मिटवू शकत नाही. हे काम ते करु शकत नाही. ते हे नाही बोलू शकत की आमची संस्कृती, आस्था आणि ओळख हिंदुंशी जोडली आहे. भारत कधी हिंदू राष्ट्र नव्हते. न आहे आणि न बनणार', अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 

मोदी_परत_जा अन् राहुल लय भारी! ट्रेंडिंगमध्ये

ओवेसी यांनी पुढे असे देखील म्हटले आहे की, 'भागवतांनी आम्हाला परदेशी मुस्लिमांशी कितीही जोडले तरी यामुळे आमची भारतीयता कमी होणार नाही. हिंदू राष्ट्रला हिंदू वर्चस्व म्हणून संबोधणे हे आम्हाला कधीच मान्य होणार नाही.' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

'महापुरात स्थानिक मदतीला धावले अन् सरकारने श्रेय लाटले' 

भुवनेश्वर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमा दरम्यान असे म्हटले होते की, 'यहुदी (ज्यू) समाज इकडे-तिकडे फिरत होता. त्यांना भारतात आश्रय मिळाला. पारसी समाजाची पूजा आणि मूळ धर्म केवळ भारतात सुरक्षित आहे. जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात मिळतील. हे का आहे ?, कारण आम्ही हिंदू आहोत, असे मोहन भागवत यांनी केले होते.

'सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज'