पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-शहांचे कौतुक करणाऱ्या रजनीकांत यांच्यावर ओवेसींची टीका

एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे मोदी सरकारचे सर्वांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील काही दिवसांपूर्वी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत समर्थन दर्शवले होते. ऐवढेच नाही तर रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक करत त्यांना महाभारतातील कृष्ण आणि अर्जुनची उपमा दिली होती. रजनीकांत यांच्या या वक्तव्यावरुन एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी भडकले असून त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र' पुरस्कार

असुदुद्दीन ओवेसी यांनी असे म्हटले आहे की, 'तामिळनाडूच्या एका अभिनेत्याने (रजनीकांत) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यामुळे कृष्ण आणि अर्जुन म्हटले आहे. मग अशा स्थितीमध्ये पांडव आणि कौरव कोण आहे? असा सवाल ओवेसी यांनी विचारला आहे. ऐवढेच नाही तर ओवेसींनी रजनीकांत यांना आणखी एक सवाल केला आहे की, तुम्हाला, देशात पुन्हा एकदा महाभारत घडवायचंय का? 

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढू: चंद्रकांत पाटील

पुढे ओवेसींनी असे म्हटले आहे की, 'मला माहित आहे की या सरकारचे जम्मू-काश्मीरवर खूप प्रेम आहे. मात्र त्यांचे काश्मीरच्या व्यक्तींवर प्रमे नाही. त्यांचे फक्त काश्मीरच्या जमिनीवर प्रेम आहे. तिथल्या व्यक्तिंवर ते अजिबात प्रेम करत नाही. हे सरकार फक्त सत्तेवर प्रेम करते न्यायावर नाही. ते फक्त सत्ता कायम ठेवू इच्छितात. पण, मी त्यांना लक्षात आणून देतो की, कोणतिही व्यक्ती अनंत काळापर्यंत जीवंत राहत नाही.' असे म्हणत ओवेसी यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे. 

हरयाणामध्ये गोळ्या झाडून पोलिस उपायुक्तांची आत्महत्या