पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वादग्रस्त वक्तव्यानंतर वारिस पठाण म्हणाले, माफी मागणार नाही!

वारिस पठाण

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकातील भाषणातील वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 'आम्ही फक्त १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू', असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांनी टीआरपीसाठी वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले. मी माझ्या वक्तव्यावर माफी मागणार नाही, असे वारिस पठाण यांनी म्हटले आहे. भाजप भारतीयांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

आमचे १५ कोटी, १०० कोटींवर भारी; वारिस पठाणांचे वादग्रस्त

'देश जेवढा नरेंद्र मोदींचा आहे तेवढाच वारिस पठाणचा आहे. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राज्यघटनेने देशातील नागरिकांना दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील आंदोलन करणे गुन्हा नाही, असे म्हटले आहे, असे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले. मी जे काही बोललो ते राज्य घटनेच्या चौकटीत राहूनच बोललो आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.  

दलितांवर अत्याचार केल्याचा राजस्थानातील व्हिडिओ भीषण - राहुल

कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएएविरोधातील सभेला संबोधित करताना त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या भाषणात 'आम्ही फक्त १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत',  'स्वातंत्र्य मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल आणि ती वेळ आली आहे.', अशी वक्तव्ये केली होती. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.