पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुरखा बंदीवर ओवेसी म्हणाले, शिवसेनेकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवाल

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी

शिवसेनेने श्रीलंका हल्ल्याचा उल्लेख करत आता भारतातही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या या मागणीचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला आहे. शिवसेना पोपट आहे, त्यांच्याकडून तुम्ही यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

ओवेसी म्हणाले की, कोणी बुरखा परिधान करावा किंवा जीन्स घालावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. लोकांचा तो मुलभूत अधिकार आहे. शिवसेना पोपट आहे, त्यांच्याकडून तुम्ही यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही. शिवसेनेच्या या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी असे सांगत त्यांनी हा प्रकार पेड न्यूजमध्ये येतो आणि निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केल्याचे वृत्त 'टाइम्स नाऊ'ने दिले आहे. 

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. भारतात श्रीलंकेसारखी घटना घडलेली नाही. त्यामुळे भारतात यावर बंदी घालण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे ते म्हणाले. 

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार, असा सवाल शिवसेनेने केला होता.