पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वारिस पठाणांविरोधात पक्षाची कारवाई, माध्यमांशी बोलण्यास घातली बंदी

वारिस पठाण आणि असदुद्दीन ओवेसी

'आम्ही फक्त १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू', असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे. एमआएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी वारिस पठाण यांना पुढील आदेशापर्यंत प्रसार माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत ओवेसींनी त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. 

 

'पाक जिंदाबाद म्हणणाऱ्या तरुणीचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन'

कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएएविरोधातील सभेला संबोधित करताना वारिस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यांनी आपल्या भाषणात 'आम्ही फक्त १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत',  'स्वातंत्र्य मिळत नसेल तर हिसकावून घ्यावे लागेल आणि आता ती वेळ आली आहे.', असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन औरंगाबादमध्ये मनसेने वारिस पठाणांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतने केली आत्महत्या

दरम्यान, वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 'देश जेवढा नरेंद्र मोदींचा आहे तेवढाच वारिस पठाणचा आहे. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राज्यघटनेने देशातील नागरिकांना दिला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी जे काही बोललो ते राज्य घटनेच्या चौकटीत राहूनच बोललो आहे. प्रसारमाध्यमांनी टीआरपीसाठी वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले. मी माझ्या वक्तव्यावर माफी मागणार नाही, असे वारिस पठाणांनी सांगितले. 

गुड न्यूज: शिल्पा शेट्टीला कन्यारत्न!