पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानात पेट्रोल- डिझेलपेक्षा दूध महाग, १४० रुपये प्रति लिटर

पाकिस्तानात दूध महागले

पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या शहरात मोहरमनिमित्तानं दूधाच्या किमतीनं उच्चांक गाठला.  कराची आणि सिंध प्रांतात या दोन दिवसात  १२० ते १४० रुपये प्रतिलीटर दूधामागे  ग्राहकांना मोजावे लागले. या किमती पेट्रोल- डिझेलच्या किमतीहूनही अधिक होत्या. 

मोहरमनिमित्तानं अनेक शहरी भागात प्रति लिटर दूधामागे ग्राहकांना  मूळ किमतीपेक्षाही अधिक पैसे मोजावे लागले. पाकिस्तानात पेट्रोलची किंमत ही दोन दिवसांत ११३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१ रुपये प्रति लिटरनं उपलब्ध होतं. तर इथल्या माध्यमांच्या माहितीनुसार सिंधमधल्या अनेक भागात  १४० रुपये प्रति लिटरनं दरानं दूधाची विक्री होत होती. 

ओव्हरलोडिंगमुळे ट्रक चालकाला तब्बल १,४१,७०० रुपयांचा दंड

मोहरमच्या काळात दूधाची मागणी वाढते, या संधीचा फायदा घेत १२० ते १४० रुपये दरानं दूधाची विक्री होत असल्याची  माहिती स्थानिक दूध विक्रेत्यानं दिली. 

मोहरमच्या दिवशी अनेक ठिकाणी छोटे छोटे स्टॉल उभारण्यात येतात. यावेळी दूध, फळांचा रस, पाणी मोफत दिलं जाते. दूधाला प्रचंड मागणी असल्यानं त्याची किंमत वाढवण्यात आली. 

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर

दूधाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे इफ्तीखार शालवानी यांचं आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचंच दिसतं आहे. विरोधाभास म्हणजे दूधाचा दर हा आधी ९४ रुपये प्रति लिटर ठरवण्यात आला होता.