पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामातील पोलीस ठाण्याजवळ ग्रेनेड हल्ला

पुलवामा येथील पोलीस ठाण्याजवळ ग्रेनेड हल्ला

जम्मू काश्मीर येथील पुलवामा पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस ठाण्याच्या दिशेने फेकलेल्या ग्रेनेडचा रस्त्यावर स्फोट झाला. यात आठ नागरिक जखमी झाले असून यातील तिघे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आयएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  

पुलवामा येथून अवघ्या ४० कि.मी. अंतरावर असलेल्या अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर काही तासांतच हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून संपूर्ण परिसराभोवती सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे. 

काश्मिरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, एक जवानही शहीद

यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. यात पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात सहभागी असलेल्या जैश ए मोहम्मद या संघटनेशी संलग्नित  साजिद मकबूल आणि तौसीफ यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर पुलवामातील पोलिस ठाण्याला लक्ष्य करण्यात आले आहे.

पुलवामामध्ये IED स्फोटात जखमी झालेले दोन जवान शहीद