पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिलिंद देवरांना वाटते, 'या' दोन नेत्यांपैकी कोणीतरी काँग्रेस अध्यक्ष व्हावे

मिलिंद देवरा

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्या नावे सूचवली आहे. पक्षाने या दोन नावांचा अध्यक्षपदासाठी विचार करावा, असे ते म्हणाले आहेत. 

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष हा तरुण आणि प्रशासकीय अनुभव असणारा असावा असे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरदिप सिंग यांनी व्यक्त केले होते. या मताला सहमती दर्शवत देवरा यांनी काँग्रेसमधील या दोन नेत्यांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी पेलण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेत्यांमधील एकाची निवड पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास देखील देवरा यांनी व्यक्त केला.  

काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी CTO, HR विभाग नेमण्याची शिफारस

या दोन नेत्यांशिवाय अन्य कोणाला संधी दिली तर चालेल का? या प्रश्नावर देवरा म्हणाले की, पक्षाचा निर्णय हा सर्वस्वी असेल. मी सूचवलेल्या नावांवर पक्षाने असहमती दर्शवली तर मला आश्चर्य वाटेल, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा दुर्देवी होता. प्रियांका गांधी या पदासाठी योग्य उमेदवार आहेत. पण गांधी घराण्यातील कोणीही पक्षाची धूरा घेऊ नये, हा गांधी कुटुंबियांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.