पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नौदलाचे मिग-२९ विमान कोसळले, पायलट सुरक्षित

मिग २९

गोव्यामध्ये भारतीय नौदलाचे मिग-२९ विमान कोसळले. या विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. परंतु, काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येते. सुदैवाने विमानाचा वैमानिक मात्र सुरक्षित आहे. 

एवढं गोंधळलेलं सरकार मी पाहिलं नाहीः फडणवीस

नौदलाचे मिग-२९ विमान सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नियमित सरावासाठी रवाना झाले होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. विमान वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांना त्वरीत याची माहिती देण्यात आली. याचदरम्यान हे विमान कोसळले. विमानात वैमानिकाशिवाय कोणीच नव्हते. योग्यवेळी बाहेर पडण्यात वैमानिकाला यश आले. 

यापूर्वी नोव्हेंबरमध्येही गोव्यात नौदलाचे एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या अपघातातील दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बचावले होते. या घटनेच्या तीन महिन्यानंतर दुसऱ्या विमानाचा अपघात झाला. विमानाच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

CAAविरोधात दिल्लीत आणखी एक रस्ता बंद, जाफराबाद येथे आंदोलन