पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोशल मीडियांवरील अफवा, फेक न्यूज रोखा, केंद्राची राज्यांना सूचना

छाया सौजन्य : PTI

नागरिकत्त्व कायद्याविरोधात देशभरातील अनेक ठिकाणी संतापाची  लाट उसळली आहे.  ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. या निदर्शनांना हिंसक वळणही लाभलं आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरीत रोखा, अशी सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला असंही सांगण्यात आलं आहे. 

मराठमोळ्या अधिकाऱ्याची लष्कर प्रमुखपदी वर्णी लागणार

'राज्यात कायदा आणि सुव्यवस्था, शांतता राखा अशा सुचना राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आलेल्या अफवा आणि खोट्या बातम्यांना आळा झाला, त्यांच्यावर कारवाई करा', अशाही सुचना करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली आहे. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचं नुकसानही करण्यात आलं आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात असंही केंद्रानं म्हटलं आहे.

जामिया हिंसाचार प्रकरण: नागपूरात काँग्रेसचे धरणे आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाम, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही हे आंदोलन सुरू झालं आहे. दरम्यान मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लाभले. याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

इंडिया गेटसमोर प्रियांका गांधींचे ठिय्या आंदोलन