पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा अर्णवला भेटलो... कुणालचे नवे ट्विट, इंडिगोनंतर स्पाईसजेट, एअर इंडियाचीही बंदी

कुणाल कामरा

एकपात्री विनोदी कलाकार (स्टँडअप कॉमेडियन) कुणाल कामरा याने पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामीबद्दल काही वक्तव्य केली आहेत. दरम्यान, इंडिगोनंतर आता एअर इंडिया आणि स्पाईसजेट या दोन विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घातली. गोएअरनेही बुधवारी दुपारी कुणाल कामरावर बंदी घातली. 

सायना नेहवालचा भाजप प्रवेश

बुधवारी सकाळी कुणाल कामराने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुन्हा एकदा अर्णव गोस्वामी माझ्या विमानात होता. मी लखनऊहून परतत होतो. मी अत्यंत विनम्रपणे त्याला विचारले की त्याला प्रामाणिकपणे चर्चा करायची आहे का, त्याने मला दूर जाण्यास सांगितले आणि मी तसेच केले.

मुंबई-लखनऊ विमानामध्ये कुणाल कामरा याने अर्णव गोस्वामीशी अयोग्य वर्तन केल्यामुळे त्याच्यावर इंडिगो विमान कंपनीने सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे कुमाल कामराला या काळात इंडिगोच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. पण इंडिगोनंतर एअर इंडिया आणि स्पाईसजेट याही दोन विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घातली. या दोन विमान कंपन्यांनी नेमकी किती कालावधीसाठी बंदी घातली आहे, याची माहिती दिलेली नाही. केवळ पुढील आदेश येईपर्यंत बंदी कायम असेल, असे या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भीमा-कोरेगाव हिंसाचार पूर्वनियोजित कट: नवाब मलिक

कुणाल कामराने केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की यापुढे मी माझ्या मनाला योग्य वाटेल तेच करेन. निर्णय घेण्यासाठी फार गणितं मांडत बसणार नाही.