पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पतीच्या मृतदेहासोबत पत्नी तब्बल २४ तास राहिली कारण...

प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्या पतीच्या मृतदेहासोबत पत्नीने तब्बल २४ तास काढल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली. या दाम्पत्याच्या ९ वर्षांच्या मुलीने काहीतरी विचित्र घडले असल्याचे समजून वेळीच नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेवर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

दिल्लीतील सहायक पोलिस आयुक्त अमित कौशिक म्हणाले, मध्य दिल्लीमध्ये एका घरात ५९ वर्षांच्या पतीचा नैसर्गिक मृत्यू झाला. पण त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीला हे समजले नाही किंवा तो मृत्यू आहे हे स्वीकारण्यास त्या तयार नव्हत्या. त्यामुळे त्या मृतदेहासोबतच थांबल्या होत्या. रविवारपासून संबंधित व्यक्ती घरातील खोलीत बेडवर झोपूनच होते. त्यांचा मृत्यू नेमका कधी झाला हे स्पष्ट नाही. पण पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांच्या मृत्यूला २४ तास उलटून गेले होते, असे पोलिसांनी सांगितले.

पतीच्या खोलीत संबंधित पत्नी कोणालाही येऊन देत नव्हती. ते झोपले आहेत. एवढेच ती सांगत होती. पण बुधवारी वडिलांच्या नाकातून रक्त आल्याचे त्यांच्या मुलीने बघितले. त्यानंतर तिने त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिला शंका आल्याने तिने तिच्या काकांना फोन करून कळविले. यानंतर काही नातेवाईक आणि शेजारी त्यांच्या घरी आले. त्यांना संबंधित ठिकाणी दुर्गंध येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना या सगळ्याबद्दल माहिती देण्यात आली. 

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट

पोलिस जेव्हा घरी आले त्यावेळी पत्नी आपल्या पतीला घेऊन जाण्यास नकार देत होती. पण त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात न्यायचे आहे, असे सांगितल्यावर पत्नीने त्यांना घेऊन जाण्यास परवानगी दिली.

या प्रकरणात कोणतेही गुन्हेगारी कृत्य नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संबंधित पत्नीला उपचारांसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे.