पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेहबूबा मुफ्तींनी पीडीपीच्या दोन खासदारांना राजीनामा देण्याचे दिले आदेश

मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांच्या पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुस्थान टाइम्सला मेहबुबा मुफ्ती यांच्या एका सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती त्यांच्या घरातून गेस्ट हाऊसमध्ये रहायला जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासदारांना राजीनामा द्या नाही तर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगितले होते. 

अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर होण्याची शक्यता

पीडीपीने भाजपसोबत जम्मू-काश्मीरमध्ये जून 2018 पर्यंत सरकार चालवले. मात्र त्यानंतर भाजपने पीडीपीला दिलेले समर्थन काढून घेतले होते. पीडीपीचे राज्यसभेमध्ये दोन खासदार आहेत. मीर फय्याज आणि नजीर अहमद अशी या खासदारांची नावं आहेत. राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले कलम 370 रद्द करावे यासाठी विधेयक सादर करण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही खासदारांनी गोंधळ घातला होता. त्यांनी आपली कपडे फाडून हाताला काळी फीत बांधून निषेध नोंदवला होता. 

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

दरम्यान, खासदार मीर फय्याज यांनी सांगितले की, 'आम्हाला सुध्दा राजीनामा देण्याची इच्छा आहे. मात्र त्याआधी पक्ष श्रेष्ठींशी बोलण्याची आमची इच्छा आहे. सध्या आम्ही कोणाशी देखील बोलू शकत नाहीये कारण जम्मू-काश्मीरमध्ये फोनसेवा बंद करण्यात आली आहे. आम्ही आधी यावर चर्चा करु त्यानंतर निर्णय घेऊ' असे त्यांनी सांगितले.'

कलम 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील काही तरतुदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकाला मंजूरी दिली. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार झाले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेला संबोधित करणार आहे. कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर ते देशाला संबोधित करणार आहेत. 

जम्मू-काश्मीरबाबत निर्णय घेण्यापूर्वी भारताने सांगितलं नाहीः अमेरिका