पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अटलबिहारी वाजपेयींची आज उणीव भासत आहेः मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्याबरोबरच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राजधानी श्रीनगरमध्येही सोमवारी मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुप्ती यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची स्मरण केले आहे. त्यांनी सोमवारी रात्री टि्वट करत आजच्या परिस्थितीत वाजपेयींची उणीव भासत असल्याचे म्हटले आहे. 

त्या म्हणाल्या की, भाजप नेते असूनही वाजपेयींना काश्मिरी जनतेची सहानुभूती होती आणि त्यांना काश्मिरी लोकांची मनं जिंकली होती. आज सर्वाधिक त्यांची उणीव भासत आहे.

रात्री उशिरा एकापाठोपाठ एक टि्वट करत त्यांच्यावर अफवा पसरवण्याचा आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला. 'ज्या लोकांनी माझ्यावर अफवा पसरवण्याचा आरोप केला आहे. त्यांना माहीत आहे की आमची भीती चुकीची नाही, हे माझ्यावर अफवा पसरवण्याचा आरोप करणाऱ्यांना माहीत आहे.'

जम्मू-काश्मीरः मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्लांसह अनेक नेते नजरकैदेत; कलम १४४ लागू

नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. बळजबरीने कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ही सामान्य बाब नाही, असे मुफ्ती यांनी म्हटले. 

हे काय सुरु आहे. आमच्यासारख्या शांततेसाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा आवाज कसा दाबला जात आहे, हे जग पाहत आहे, असे दुसऱ्या एका टि्वटमध्येही त्यांनी म्हटले.