पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरः मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्लांसह अनेक नेते नजरकैदेत; कलम १४४ लागू

उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमध्ये अभूतपूर्व सुरक्षा आणि वेगवान हालचालींदरम्यान रविवारी अनेक मोठ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. दुसरीकडे काँग्रेस नेते उस्मान माजिद आणि सीपीएम नेते एम वाय तारिगामींनी त्यांना मध्यरात्री उशिरा अटक केल्याचा दावा केला आहे. परंतु, या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. दुसरीकडे जम्मूमध्ये आज (सोमवार) सकाळी ६ पासून कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ ऑगस्ट सकाळी ६ पासून कलम १४४ लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहिल. या कालावधीत ४ हून अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही, असे जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. जम्मूत मोबाइल, इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अबुदल्ला यांनी रात्री उशिरा टि्वट करत नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे सांगितले. 'हे काय सुरु आहे. आमच्यासारख्या शांततेसाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा आवाज कसा दाबला जात आहे, हे जग पाहत आहे,' असे मुफ्तींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, उमर अब्दुल्ला यांनीही याप्रकरणी टि्वट केले. ते म्हणाले की, मला वाटतं की, मध्यरात्रीपासून मला नजरकैदेत ठेवले जात आहे. प्रमुख नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याचे सत्य जाणण्याचा कुठलाच मार्ग नाही. पण हे सत्य असेल तर मग पुढे काय होते ते पाहुयात. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mehbooba Mufti Omar Abdullah house Arrest say Jammu kashmir officials Section 144 imposed in Srinagar