पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रणव मुखर्जींना भेटणे हा नेहमीच समृद्ध करणारा अनुभव - मोदी

प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदींचे तोंड गोड केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. प्रणवदांना भेटणे हा नेहमीच समृद्ध करणारा अनुभव असतो, असे मोदींनी म्हटले आहे. 

प्रणव मुखर्जींना भेटल्यानंतर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी याबद्दल माहिती दिली. प्रणवदांना भेटणे हा कायमच समृद्ध करणारा अनुभव असतो. त्यांचे ज्ञान आणि सखोल माहिती यांची तुलनाच करता येणार नाही. त्यांनी देशासाठी अतुल्य योगदान दिले आहे. आज त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, असे नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

यावर्षी जानेवारीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारकडून देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार तिघांना जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रणव मुखर्जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नानाजी देशमुख आणि गायक दिवंगत भुपेन हजारिका यांचा समावेश होता. 

गेल्यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रणव मुखर्जी यांना बोलावण्यात आले होते. त्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली होती. भारतमातेचा मोठा सुपूत्र असे त्यांचे वर्णन प्रणव मुखर्जी यांनी केले होते.