कर्नाटक विधानसभेत एच डी कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेता निवडण्यासंदर्भात बैठक बोलावली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मधुसूदन मिस्त्री यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेता पदासाठी दावेदारीसाठी अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
आरे वृक्षतोड प्रकरण SC ने घेतले मनावर, उद्या होणार सुनावणी
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमधील एका हॉटेलमध्ये विरोधी पक्षनेता निवडण्यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी अनेक नेत्यांनी या पदासाठी दावा केला आहे. १० ऑक्टोबर पासून कर्नाटक विधानसभेचे सत्र सुरु होणार आहे. मात्र भाजप सरकारचा सामना करण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने अद्यापही विरोधी पक्ष नेत्याची निवड केलेली नाही.
'आरे वाचवा' मोहिमेतील २९ जणांना जामीन
काँग्रेस आणि जनता दल आघाडी सरकारमधील काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याव्यतिरिक्त माजी मंत्री एच के पाटील, माजी उप मुख्यमंत्री डॉ. परमेश्वर अन्य काही दिग्गज नेत्यांनी विरोधी पक्ष नेते पदाच्या शर्यतीत आहेत. काही आमदारांनी सिद्धरामय्या यांना समर्थन दिले आहे. मात्र काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला आहे. लोकसभा सदस्य मनुयप्पा यांनी त्यांच्या नावाला उघड विरोध केला आहे.