पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार-नरेंद्र मोदी यांच्यात पाऊण तास चर्चा

शरद पवार संसद भवनामध्ये जाताना

राज्यातील सत्तापेच जवळपास महिन्यानंतरही कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यात यावी, अशी मागणी यावेळी शरद पवार यांच्याकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दोन्ही नेत्यांमधील पाऊण तास चर्चा केली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याटे नाकारता येणार नाही. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संसद भवनामध्ये प्रवेश करताना शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना देण्यास नकार दिला.

उद्या चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार-राऊत

मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेतील युती तुटल्यानंतर आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. याबद्दल लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात नवे सरकार सत्तेवर येईल, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारीच म्हटले आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

परतीच्या पावसानंतर राज्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे सगळ्याच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. नागपूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनीच आपण लवकरच हे सर्व मुद्दे घेऊन नरेंद्र मोदी यांना भेटू असे म्हटले होते. त्यानंतर ही भेट होते आहे.

धक्कादायक!, शाळेत विद्यार्थिनींचे लेगिन्स काढले

शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषदेत आमचे शिवसेनेसोबत जाण्याचे काहीच ठरलेले नाही. या संदर्भात आमची कोणतीही चर्चाही झालेली नाही, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीमध्ये भेटणार आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा होणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे असणार आहे.