पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: मेरठमधील पवन जल्लाद दोषींना फाशी देणार

निर्भया प्रकरणातील दोषी

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फासावर लटकवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चारही दोषींना १६ डिसेंबरनंतर फाशी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोषींना फासावर लटकवण्यासाठी मेरठ येथील पवन जल्लाद याला फोन करण्यात आला होता. कारागृह महासंचालक आनंद कुमार यांनी यासंदर्भात तिहार जेलमधून पत्र आले असल्याचे सांगितले आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये फक्त दोनच जल्लाद आहेत. लखनऊमधील इलियास जल्लाद सध्या आजारी आहे.

शिवसेनेकडे गृह, नगरविकास; राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, घोषणा लवकरच

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये विनय, अक्षय, पवन आणि मुकेश हे चौघे जण दोषी आहेत. मंडोली जेलमध्ये ठेवण्यात आलेला दोषी पवन गुप्ताला तिहार जेलमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील बाकी तीन आरोपी तिहार जेलमध्येच आहेत. पवन गुप्ताला तिहार जेल क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी अन्य दोषी मुकेश आणि अक्षय आहेत. तर, चौथा दोषी विनय शर्मा याला तिहार जेल क्रमांक ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. 

कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीने चर्चेला

सात वर्षांपूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. सहा पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात तीन वर्षासाठी पाठवण्यात आले होते. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी रामसिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर उर्वरीत चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. 

'मनोहर जोशींनी केलेले विधान ही त्यांची वैयक्तिक भूमिका'