पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानात १०० बालकांचा मृत्यू; मायावतींची काँग्रेस, प्रियांकांवर टीका

मायावती

राजस्थानातील कोटामध्ये मागील डिसेंबर महिन्यात १०० बालकांचा मृत्यू झाला. जे के लोन रुग्णालयात एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे आता यावरून राजकारण तापू लागले आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी या विषयावरून काँग्रेसवर निशाणा साधला.

आणि प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी पश्चिम बंगालचा प्रस्ताव वगळला

महिन्याच्या कालावधीत रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे मायावती यांनी राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवर टीका केली. गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसशासित राजस्थानमधील कोटामध्ये महिन्याभरात १०० बालकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. राजस्थानमधील गेहलोत यांचे सरकार या संदर्भात अत्यंत उदासीन, असंवेदनशील आहे. सरकारचे काम निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे नाव न घेता मायावती यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. उत्तर प्रदेशात पीडित कुटुबियांची भेट घेण्यासोबतच प्रियांका गांधी यांनी राजस्थानमध्ये जाऊन ज्या आईने आपल्या पोटच्या पोराला गमावले. त्यांचीही भेट घेतली पाहिजे, असे मायावती यांनी म्हटले आहे.

मारुती सुझुकी आणि महिंद्रा एँड महिंद्रासाठी वर्षाचा शेवट गोड!

मिळालेल्या माहितीनुसार जे के लोन रुग्णालयात डिसेंबरच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये ८ बालकांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण महिन्यात या रुग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या १०० झाली आहे. राज्यातील अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली.